काश्मीरमध्ये शारदादेवी मंदिराच्या उभारणीला आरंभ !

शेकडो वर्षांपासूनची तीर्थयात्रेची परंपरा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न ! मंदिरांच्या उभारणीसमवेत त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होण्यासाठी जिहादी आतंकवादाच्या विरोधात प्रभावी उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे हिंदूंना वाटते !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका दाखवणार महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ‘पावनखिंड’ चित्रपट !

२ सहस्र विद्यार्थ्यांचा व्यय महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वत: करणार आहेत. अन्य कोणी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यास कुणी इच्छुक असल्यास कृपया महापालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.

गडकोटांवरील इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक ! – नितीन शिंदे, माजी आमदार

महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले.

नरसंहाराचा इतिहास !

एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल !

हिंदूंनो, ‘पावनखिंड’ चित्रपटातून ऐतिहासिक प्रेरणा घ्या !

हिंदूंचे होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांधांची मंदिरांवरील आक्रमणे, गड-दुर्ग यांवरील वाढत चाललेली इस्लामी अतिक्रमणे अशा विविध संकटांनी हिंदूंना सिद्धी जोहरच्या विळख्याप्रमाणे वेढलेले आहे. त्यासाठी ‘पावनखिंड’ चित्रपट मनोरंजन म्हणून न पहाता त्याकडे दायित्वाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चित्रपट निर्मितीचा उद्देश साध्य होईल.

छत्रपती शिवराय स्वधर्म स्वाभिमानी कि धर्मनिरपेक्ष ?

खोटा इतिहास सांगणे म्हणजे सरळसरळ हवेला लाथा मारण्याचा प्रकार म्हणावा लागेल. एकीकडे दादोजी कोंडदेव यांना नाकारून बाबा याकूत यांना शिवरायांचा गुरु ठरवण्याचा प्रयत्नही चालू आहे. त्यामुळे आपल्या शिवकालीन गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

आक्रमकांच्या स्मृती पुसाच !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी केली; परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही शासनकर्त्यांना ती पूर्ण करता आली नाही. आज त्याच शिवसेनाप्रमुखांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे या सरकारच्या कारकीर्दीत तरी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा आहे.

‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावास मान्यता न दिल्याने विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे याची मूळ कल्पना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

भारतमातेच्या मुक्तीयज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर उपाख्य तात्या सावरकर म्हणजे मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव केलेला एक अखंड प्राण-यज्ञ ! जीवनाची एक अव्याहत आहुती ! त्यांनी या यज्ञाची सिद्धता छत्रपती शिवरायांप्रमाणे बालवयातच केली होती.

कलुषित ‘व्हिजन’ !

आपला देश किती सामान्य होता आणि आलेले आक्रमकच कसे महान होते ? हे शिकवणारा अन् असली शिकवण ऐकून घेणारा एकमेव देश भारत ! शिक्षक सांगतील, त्यावर विश्वास ठेवायला स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थीही फार लहान नसतात. त्यानीच याचे खंडण करून वाचा फोडली तर हे अपप्रकार रोखण्यास साहाय्य होणार आहे !