
सांगली, २५ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण देशाला धोकादायक आहे. हे आक्रमण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन माजी आमदार आणि भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले. ‘गड जिहाद’ रोखण्यासाठी भाजपच्या वतीने एक दक्षता समिती स्थापन करण्यात आली. यात माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याविषयी भोई गल्ली, खणभाग येथील ‘विजय क्रीडा मंडळा’च्या वतीने श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. निरंजन कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. सौरभ सटाले, सर्वश्री सुरेश गरड, प्रदीप निकम, आशिष साळुंखे, दिग्विजय शिंदे, राहुल शिंदे, गौरव गडदे, ऋतिक शिंदे यांसह अन्य शिवभक्त उपस्थित होते.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !