परभणी येथे बागेश्वर धाम येथील पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट !

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चांगले कार्य करत आहात’, असे म्हणून कु. प्रियांका लोणे यांचा आशीर्वादरूपी सत्कार केला.

हिंदु राष्ट्रासाठी जागे झाले नाही, तर उद्या इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, तरुण हिंदू

हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येक गावात जाऊन हिंदूंना एकत्र करून प्रबोधन करावे लागेल. जर आपण आज हिंदु राष्ट्रासाठी जागे झालो नाही, तर उद्या आपल्याला इस्लामी राष्ट्रात रहावे लागेल, असे वक्तव्य ‘तरुण हिंदू’ संघटनेचे संस्थापक डॉ. नील माधव दास यांनी केले.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘हिंदु राष्ट्रा’चा लागलेला ध्यास !

पू. वामन यांना ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्यास लागला आहे’, याची जाणीव मला मागील काही दिवसांपासून सतत होत आहे. ‘बालसंतांचे वागणे आणि त्यांचे सूक्ष्मातील कार्य समाजापर्यंत पोचावे’; म्हणून त्यांतील काही प्रसंग येथे दिले आहेत.

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्मरक्षणाचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

ओझर (पुणे) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ ! मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील ५५० हून अधिक विश्‍वस्त एकवटले ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला … Read more

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या अनुषंगाने धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व !

सात्त्विक हिंदु राष्ट्रात कोणताही भ्रष्टाचार नसेल !

Movement To Restore Monarchy In Nepal : नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था आणण्याची मागणी !

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले.

लखलखला संस्कृतीचा शुक्रतारा

वर्ष २०१४ च्या निवडणुकीत चमत्कार का घडला ? याचा विचार आपल्याकडे विशेषत्वाने केला जात नाही. आजसुद्धा परिस्थिती विशेष पालटलेली नाही. वर्ष २०१४ मध्ये असे काय घडले की, ‘ज्यामुळे भलेभले प्रस्थापित उन्मळून पडले आणि देहलीच्या बाहेरचा माणूस पंतप्रधान झाला’, याचा शोध घ्यावा, असे वाटले नाही आणि अद्यापही वाटत नाही.

Hindu Rashtra Adhiveshan : प्रभु श्रीराम आपल्‍या मनात आहेत आणि ‘रामराज्‍य’ हे आपले ध्‍येय आहे ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्‍ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर आज हिंदूंना आत्‍मभान नसेल, तर त्‍यांच्‍यात शत्रूभावना कशी येईल ? हिंदु समाजाने हिंदु संघटनांच्‍या माध्‍यमातून हे लक्षात घेतले पाहिजे, यासाठीच हे ‘हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ !

‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसंदर्भात परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले उत्तर अन् त्‍याविषयी श्री. राम होनप यांची झालेली विचारप्रक्रिया

‘भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना व्‍हायला हवी; परंतु त्‍या दृष्‍टीने आपली सिद्धता अल्‍प आहे. ‘आपल्‍याकडे आवश्‍यक असलेले सात्त्विक लोकांचे संख्‍याबळ नाही, पैसा नाही आणि धर्माच्‍या प्रसारासाठीचे अत्‍याधुनिक तंत्रज्ञान नाही’, अशा परिस्‍थितीत हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना कशी होईल ?’’

‘अंनिस’ला पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे खुले आव्हान !

आता अंनिस हे आव्हान स्वीकारेल कि त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार गप्प बसणार, हे तिने स्पष्ट केले पाहिजे. अन्यथा हिंदूंच्या संतांवर चिखलफेक करणार्‍या अशा संघटनांना उत्तरदायी धरून सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !