श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सप्तर्षी आणि संत यांचे संदेश
‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल. या कालावधीत ‘अयोध्येमध्ये श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊन ‘श्रीराममूर्ती’ची प्राणप्रतिष्ठा होणे’, हे ईश्वरी नियोजन आहे. आता श्रीरामजन्मभूमीच्या विषयाला जरी पूर्णविराम लाभला असला, तरी अजून श्रीकृष्णजन्मभूमीचा विषय अपूर्ण आहे. कालमाहात्म्यानुसार आता श्रीकृष्णजन्मभूमीचा विषय पूर्ण करण्याची वेळ जवळ आली आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादानेच सनातन धर्मराज्याची स्थापना होणार आहे. सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेमुळे भारतभूमीला नवऊर्जा प्राप्त होणार आहे.’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, ७.१.२०२४)