काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांचे विधान !

दावणगेरे (कर्नाटक) – काही जण आपल्या देशाला हिंदु राष्ट्र बनवायला निघाले आहेत. तसे झाले, तर आपला देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यासारखा होईल. धर्माच्या नावावर ते देश दिवाळखोर झाले आहेत. त्याप्रमाणे आपला देशही धर्मनिरपेक्षता सोडून धर्माच्या मागे लागल्यास प्रगती होणार नाही आणि देश दिवाळखोर होईल, असे विधान काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांनी केले.
सौजन्य : इंडिया टूडे
यतींद्र सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, भाजप आणि तिची मातृसंस्था रा.स्व. संघ यांच्याकडून धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला धोका आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणार्या पक्षांपासून आपण सावध असले पाहिजे.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या ! |
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
संपादकीय : मनसुबे उघड !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !