हिंदु राष्ट्राची घोषणा कुठल्याही क्षणी शक्य ! – श्री महंत हरि गिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक, श्री पंचदशनाम जूना आखाडा  

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

श्री महंत हरि गिरीजी महाराज

अयोध्या – अयोध्येत आता भव्य श्रीराममंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे हिंदूंनी सिद्ध राहिले पाहिजे; कारण आता कुठल्याही क्षणी हिंदु राष्ट्राची घोषणा होण्याची शक्यता आहे,  असे वक्तव्य श्री पंचदशनाम जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरि गिरीजी महाराज यांनी येथे केले. महाराज आणि त्यांचे सर्व भक्त येथील प्रसिद्ध श्री नागेश्‍वर नाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी ते सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलत होते. श्री महंत हरि गिरीजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याने सर्व हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्वागतासाठी सिद्ध रहावे. घरोघरी दिवे लावावेत, तसेच मोठ्या प्रमाणात दिपोत्सव साजरा करावा.’’