SANATAN PRABHAT EXCLUSIVE : पोलिसांचे भाविकांशी चांगले वर्तन – अयोध्या सोहळ्याची जमेची बाजू !

अयोध्येतील रामोत्सव सोहळा ! रामोत्सवात अर्थात् श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आरंभीपासूनच उत्तरप्रदेश पोलिसांचे भाविकांशी अत्यंत चांगले वर्तन होते. हे पाहून माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना !

अयोध्येला भारतातील सर्वांत स्वच्छ नगर करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत ! – महंत गिरीशपती त्रिपाठी, महापौर, अयोध्यानगर निगम

अयोध्येत येणार्‍या भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वत्र दिव्यांची सजावट करण्यात आली आहे.

बाबरच्या आक्रमणापासून वाचवलेली श्रीरामाची मूळ मूर्ती स्थानापन्न असलेले अयोध्येतील प्राचीन श्री काळेराम मंदिर !

अखंड शाळीग्राम शिळेत बनवण्यात आलेल्या ५ मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये मध्यभागी श्रीराम, डावीकडे सीतामाता, उजवीकडे लक्ष्मण, तर एका बाजूला भरत आणि दुसर्‍या बाजूला शत्रुघ्न यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती पाहूनच भाविकांचा भाव जागृत होतो.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘श्री रामलला विशेषांका’स उत्स्फूर्त प्रतिसाद !

दैनिक ‘सनातन प्रभात’ने २१ जानेवारीला श्रीरामाविषयी माहिती देणारा रंगीत ‘श्री रामलला विशेषांक’ प्रकाशित केला होता. याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी नागरिक, मंडळे यांनी स्वयंस्फूर्तीने दैनिकाचे प्रकाशन, वितरण केले.

अशी सजली अयोध्यानगरी !

राममय झाल्याची अनुभूती लक्षावधी हिंदूंना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.

संघर्षाचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रेरणा वनवासात गेलेले श्रीराम देतात ! – डॉ. कुमार विश्वास, प्रसिद्ध रामकथाकार

डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात.

भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय !

अयोध्येतील श्रीराममंदिरातील प्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला म्हणजे २१ जानेवारीला सकल हिंदु समाजाच्या वतीने कोल्हापूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज, श्रीरामाचा जयघोष यांमुळे करवीरनगरी श्रीराममय झाली होती.

Ayodhya Ram Mandir : श्री रामललाच्या दर्शनसाठी अयोध्याच्या प्रवेशद्वारावर लाखो भाविक प्रतीक्षेत !

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

चंद्रपूर येथे ‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राला ३० सहस्र दिव्यांनी प्रकाशमय केले !

२० जानेवारी या दिवशी चांदा क्लब मैदानावर पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘सियावर रामचंद्र की जय’ या ११ अक्षरी मंत्राला ३० सहस्र दिव्यांनी प्रकाशमय केल्याने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये चंद्रपूरचे नाव नोंदवले गेले आहे.

अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार नाहीत !

मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळाला घेऊन अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री लवकरच या दौर्‍याची माहिती घोषित करतील.