पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई करावी !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असून त्यांनी अनेक युवकांना दिशा देऊन त्यांना देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे.
पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असून त्यांनी अनेक युवकांना दिशा देऊन त्यांना देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे.
ओडिशामधील राऊरकेला, बिरमित्रपूर, भुवनेश्वर, कटक, जगतपूर आणि ब्रह्मपूर, तसेच झारखंडमधील रांची, कतरास, धनबाद अन् जमशेदपूर या भागात ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्यात आले.
वक्फ बोर्डाच्या भूमींच्या कुंपणासाठी ३४ कोटी ५१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत; परंतु देवस्थानांच्या भूमींच्या रक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.
या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.
‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळ विसर्जित करून प्रशासक नेमण्यापूर्वी ज्या भाविकांनी दागिने दान म्हणून दिले, त्यांच्या नोंदी नाहीत, तसेच देवस्थानाकडे नेमक्या किती भूमी आहेत ? याच्याही नोंदी नाहीत. त्यामुळे ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची चौकशी झालीच पाहिजे. याच समवेत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचीही चौकशी झाली पाहिजे.
जळगाव येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता.
आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे.
इचलकरंजी शहरातील ‘इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड ग्यामा एन्टरप्रायझेस’ या आस्थापनाकडून प्राण्यांच्या कातड्यावर प्रक्रिया केलेले, तसेच रक्त आणि मांसमिश्रित सांडपाणी विनाप्रक्रिया ओढ्यात सोडले जाते.