जळगाव शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरावरील भगवे ध्वज काढू नयेत ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे आयुक्तांकडे मागणी !

महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव – येथील महानगरपालिका आयुक्तांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका हद्दीतील राजकीय पक्ष किंवा पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्यासंदर्भातील आदेश नुकताच काढला होता. त्यानुसार शहरात कार्यवाही चालू झाल्यावर काही भागांत नागरिकांच्या घरावर, खासगी मालमत्तेवर लावलेले धार्मिक ध्वज काढण्यात आल्याचे प्रकार झाले आहेत, तसेच काही ठिकाणी पालिका कर्मचार्‍यांनी असे ध्वज काढून ठेवण्यास सांगितले आहे. तरी निवडणुकीचा आणि धार्मिक ध्वज यांचा काहीही संबंध नसल्याने अशी नियमबाह्य कृती पालिका कर्मचार्‍यांनी करू नये, तसेच याविषयी स्पष्ट आदेश निर्गमित केले जावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना देण्यात आले.

या वेळी अधिवक्ता प्रीतम पाटील, सर्वश्री गजानन तांबट, आकाश चव्हाण, निखिल कदम, माधवदास सावलानी, परेश पाणी, भूषण पाटील, सौरभ तांबट, सागर आवटे, सुरेश पाटील, वैभव अडकमोल, दीपक सोनवणे, विजय हटकर, आशिष गांगवे हे उपस्थित होते.

सदर कृत्य गैरसमजातून ! – डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव

घरावरील भगवे ध्वज काढण्याचे कृत्य गैरसमजातून झाले असल्याचे सांगत तात्काळ पुन्हा स्पष्ट आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिले.

संपादकीय भूमिका

निवडणुकीचे निमित्त करून जनतेला घरावरील भगवे ध्वज काढायला लावणारे प्रशासन हिंदुद्वेषीच !