हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे ओडिशा आणि झारखंड राज्‍यांमध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती संपर्क अभियान’ !

हिंदु राष्‍ट्र-जागृती बैठकांचे आयोजन

डावीकडून सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. शंभू गवारे, ‘हिंदु पिठा’चे संस्‍थापक श्री. अरुण सिंह

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशामधील राऊरकेला, बिरमित्रपूर, भुवनेश्‍वर, कटक, जगतपूर आणि ब्रह्मपूर, तसेच झारखंडमधील रांची, कतरास, धनबाद अन् जमशेदपूर या भागात ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्‍यात आले. हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आणि समितीचे पूर्व अन् पूर्वोत्तर भारत राज्‍य समन्‍वयक श्री. शंभू गवारे यांची या अभियानाच्‍या अंतर्गत विविध ठिकाणी व्‍याख्‍याने आयोजित करण्‍यात आली. सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आणि श्री. शंभू गवारे यांनी अनुक्रमे ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेमध्‍ये साधनेची आवश्‍यकता’ आणि ‘हलाल (इस्‍लामनुसार जे वैध ते) अर्थव्‍यवस्‍थेची भीषणता’ या विषयांवर उपस्‍थितांना संबोधित केले.

ब्रह्मपूर (ओडिशा) येथील अधिवक्‍ता बैठकीला मार्गदर्शन करतांना सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ

अ. सुंदरगड जिल्‍हा न्‍यायालयाचे शासकीय अधिवक्‍ता बिभूतीभूषण पलई यांनी राऊरकेला येथील मानस मंदिरामध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि धर्माभिमानी अधिवक्‍ते यांच्‍यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.

आ. ओडिशातील ब्रह्मपूर येथील धर्माभिमानी तथा ‘अधिवक्‍ता परिषदे’चे अध्‍यक्ष अधिवक्‍ता कैलाशचंद्र पाणिग्रही यांनी धर्माभिमानी अधिवक्‍त्‍यांसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी सर्व अधिवक्‍त्‍यांनी त्‍यांच्‍या शहरात हलाल अर्थव्‍यवस्‍थेविषयी लोकांना जागृत करण्‍याचा निर्धार केला.

इ. श्री. मनोज पाणिग्रही यांनी ओडिशातील गायत्री शक्‍तीपीठ, बारही हिल, हिंजिलिकट येथे धर्मप्रेमींसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते.

ई. ब्रह्मपूर येथील फ्रेंड्‌स कॉलनी येथे बैठकीचे आयोेजन करण्‍यात आले. या बैठकीसाठी धर्मप्रेमी श्री. विश्‍वनाथ साहू यांनी स्‍थळ उपलब्‍ध करून दिले.

उ. कटक येथील ‘ओडिशा सुरक्षा सेना ऑफिस ऑडिटोरियम’ येथे ‘ओडिशा सुरक्षा सेना’ आणि ‘क्रांती ओडिशा मिडिया’चे संस्‍थापक श्री. अभिषेक जोशी यांनी बैठकीचे आयोजन केले होते.

ऊ. हतियासुनी नगर, भुवनेश्‍वर येथील सरस्‍वती शिशु विद्या मंदिर येथे विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थ्‍यांच्‍या माता यांच्‍यासाठी बैठकीचे आयोजन करण्‍यात आले.

ए. जमशेदपूर (झारखंड) येथे ‘हिंदु पिठा’चे संस्‍थापक श्री. अरुण सिंह यांनी त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांसाठी बैठकीचे आयोेजन केले.


व्‍याख्‍याने

१. जगतपूर, कटक येथे ओडिशा उच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता तथा ‘विश्‍व गोसुरक्षा वाहिनी, ओडिशा’चे अध्‍यक्ष सुरेश पांडा यांनी ‘हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेमध्‍ये साधनेची आवश्‍यकता’ या विषयावर व्‍याख्‍यान आयोजित केले.

२. बिरमित्रपूर येथील श्री जगन्‍नाथ मंदिर येथे हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. जयराज ठाकूर यांनी व्‍याख्‍यानाचे आयोजन केले.

३. कलुंगा, राऊरकेला येथील कलुंगा हनुमान मंदिर येथे श्री. शंकर वर्मा यांनी स्‍थानिक  बजरंग दल कार्यकर्त्‍यांसाठी व्‍याख्‍यानाचे आयोजन केले.

ओडिशामध्‍ये वैयक्‍तिक संपर्कांच्‍या माध्‍यमातून धर्मप्रसार

ओडिशातील प्रसिद्ध लेखक तथा इतिहासकार श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंचाचे राष्‍ट्रीय महामंत्री डॉ. अशोक आचार्य, क्रियायोग आश्रम अन् क्रियायोग फाऊंडेशन ट्रस्‍टचे अध्‍यक्ष स्‍वामी शंकरानंद गिरी महाराज, धर्माभिमानी डॉ. कपिलेश्‍वर मिश्रा; कलिंगा आश्रम, ब्रह्मपूरचे अधिवक्‍ता रमेश पांडा, अधिवक्‍ता तृणमूल कुमार रेड्डी, ‘मानस परिषद, राऊरकेला’चे सचिव श्री. राजकुमार शुक्‍ला, ‘गायत्री शक्‍तीपीठ, राऊरकेला’चे श्री. नित्‍यानंद दास आणि नेत्र मंदिराचे मालक तथा हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. जयदेव दास; ‘श्रीराम मंदिर, बिष्‍टुपूर, जमशेदपूर’चे महासचिव सी.व्‍ही. दुर्गाप्रसाद यांची सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ अन् श्री. शंभू गवारे यांनी भेट घेतली.