वृद्धावस्थेच्या कठीण काळाला तोंड देण्यासाठी तारुण्यावस्थेतच साधना चालू करा !
‘मनुष्यासाठी त्यांच्या जन्मामध्ये जन्म ते प्रौढावस्था हा पुष्कळ मोठा कालावधी असतो. त्यानंतर वृद्धावस्था ते मृत्यू हा फार अल्प कालावधी असतो. वृद्धावस्थेत त्या व्यक्तीला वयोमानामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमुळे नवीन काही शिकणेही कठीण असते. अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी केवळ स्वतःची साधनाच उपयोगी पडू शकते.