परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे दाते कुटुंबियांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्यासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

१९.१२.२०२४ ते २४.१२.२०२४ या कालावधीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्यासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार कोणता नामजप अन् न्यास करणे आवश्यक आहे ?’, हे सांगितले. त्यानुसार दाते कुटुंबियांनी (पू. दातेआजींच्या मोठ्या कन्या श्रीमती अनुराधा पेंडसे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७० वर्षे), मधला मुलगा डॉ. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६६ वर्षे), मधली सून सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), लहान मुलगा श्री. निरंजन दाते आणि लहान सून सौ. नेहा दाते यांनी) आलटून-पालटून पू. दातेआजी यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. ते पुढे दिले आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

दिनांक : १९.१२.२०२४

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय

१ अ. जप आणि जपाचा कालावधी : आधी ‘पंचम’ हा जप सांगितला होता. नंतर तो पालटून ‘ॐ’ हा जप दिवसभरात जेवढा होईल, तेवढा करावा – ७ घंटे केला.

१ अ १. मुद्रा : एका हाताची ५ बोटे जुळवून खालील पहिल्या बिंदूच्या वर आणि दुसर्‍या हाताची ५ बोटे जुळवून दुसर्‍या बिंदूच्या वर धरावीत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

अ. अनाहतचक्राच्या ३ सें.मी.वर आणि भ्रूमध्यावर

आ. गळ्यावर आणि केसांच्या मध्यभागी भांग चालू होतो, त्या बिंदूच्या वर

इ. नाक आणि तोंड यांच्या मध्यावर अन् सहस्राराच्या मागे२ सें.मी. अंतरावर

दिनांक : २०.१२.२०२४

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय

१ अ. नामजप आणि नामजपाचा कालावधी : ‘श्री गणेशाय नमः ।’,हा नामजप दिवसभरात जेवढा होईल, तेवढा करावा – ८ घंटे केला.

१ अ १. मुद्रा : दोन्ही हातांची ५ बोटे जुळवून अनाहतचक्राच्या वर ३ सें.मी.वर धरावी.

१ अ २. मुद्रा : एका हाताची ५ बोटे जुळवून खालील पहिल्या बिंदूच्या वर आणि दुसर्‍या हाताची ५ बोटे जुळवून दुसर्‍या बिंदूच्या वर धरावी.

अ. गळ्यावर आणि केसांच्या मध्यभागी भांग चालू होतो, त्याच्या मागे १ सें.मी.वर

आ. नाकावर आणि सहस्रारावर

इ. भ्रूमध्यावर आणि सहस्राराच्या मागे२ सें.मी.वर

२. पू. आजींचा खोकल्याचा त्रास वाढल्याने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी पुढील उपाय सांगितले.

२ अ. नामजप आणि नामजपाचा कालावधी : ‘शून्य’ हा नामजप १ घंटा करावा.

२ अ १. मुद्रा : उजव्या हाताचा तळवा मणिपूरचक्राच्या वर आणि डाव्या हाताचा तळवा डोक्याच्या डाव्या बाजूच्या वर धरावा.

२ अ २. नामजप आणि नामजपाचा कालावधी : ‘शून्य’ हा नामजप २ घंटे करावा.

२ आ. मुद्रा : एका हाताचा तळवा विशुद्धचक्राच्या वर आणि दुसर्‍या हाताचा तळवा सहस्राराच्या वर धरावा.

दिनांक : २१.१२.२०२४

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय

१ अ. जप आणि जपाचा कालावधी : ‘६ (षट् )’ हा जप दिवसभरात जेवढा होईल, तेवढा करावा – ८.३० घंटे केला.

१ अ १. मुद्रा : एका हाताची ५ बोटे जुळवून खाली दिलेल्या पहिल्या बिंदूच्या वर आणि दुसर्‍या हाताची ५ बोटे जुळवून खाली दिलेल्या दुसर्‍या बिंदूच्या वर धरावी.

अ. अनाहतचक्राच्या ५ सें.मी.वर आणि भ्रूमध्यावर

आ. नाकाच्या शेंड्यावर आणि सहस्राराच्या मागे २ सें.मी.वर

१ अ २. मुद्रा : दोन्ही हातांची ५ बोटे जुळवून हनुवटीवर धरावीत.

सौ. ज्‍योती दाते

२. पू. आजींचा खोकल्याचा त्रास वाढल्याने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले उपाय !

२ अ. जप आणि जपाचा कालावधी : ‘शून्य’ हा जप १ घंटा करावा.

२ अ १. मुद्रा : एका हाताचा तळवा मणिपूरचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा सहस्रारावर धरावा.

२ आ. जप आणि जपाचा कालावधी : ‘शून्य’ हा जप १ घंटा करावा.

२ आ १. मुद्रा : एका हाताचा तळवा विशुद्धचक्रावर आणि दुसर्‍या हाताचा तळवा सहस्रारावर धरावा.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले सूत्र

पू. आजींच्या खोलीत लावलेल्या स्वस्तिकाकडे बघत जप करावा.

 (क्रमश:)

या लेखातील पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा  – https://sanatanprabhat.org/marathi/896205.html

– सौ. ज्योती नरेंद्र दाते (पू. दातेआजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.