परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथाच्या संदर्भात एका साधिकेला आलेल्या अनुभूती
स्वयंसूचना घेण्यास आरंभ करण्यापूर्वी मी परात्पर गुरुदेवांचा छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ उघडला. त्यातील परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे पाहून मी प्रार्थना केली. प्रार्थना करतांना मी माझे हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवले होते. त्या वेळी मला माझ्या हातात पुष्कळ ऊर्जा आणि उष्णता जाणवत होती. या ऊर्जेमुळे माझे हात आपोआपच उघडत होते.