इतर साधनामार्ग आणि गुरुकृपायोग यांमधील भेद
‘इतर साधनामार्गांमध्ये साधनेसाठी खाणे, पिणे, कपडे यांसारखी काही बंधने असतात. त्यांचे काही नियम पाळावे लागतात. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना मन नामजपावर एकाग्र करणे आणि मनात भाव ठेवणे, इतकेच करावे लागते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे होणारी हानी’ या विषयावरील लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
‘विज्ञानाने माणसाला सुखलोलूप बनवले. त्यामुळे तो खर्या आनंदापासून, म्हणजे ईश्वरापासून अधिकाधिक दूर जात आहे आणि त्यामुळे अधिकाधिक दुःखी, तसेच हिंसक (आसुरी) होत आहे.’
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत.
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्यधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात.’
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
गेले ३ दिवस माझ्या मनाची स्थिती ठीक नव्हती. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आत्मनिवेदन करतांना ‘तुमचे माझ्याकडे लक्ष नाही. तुम्ही मला विसरला आहात’, असे सांगत होतो.
सर्वसाधारण व्यक्ती आणि साधक यांच्या विचारसरणीतील मूलभूत भेद !
‘सर्वसाधारण व्यक्ती बुद्धिनिष्ठ असते. ती ‘मला वाटते, तेच खरे’ अथवा ‘मला ‘हे’, ‘ते’ सर्वच कमवायचे आहे’, या विचारसरणीची असते, तर साधक ‘मला सर्व गोष्टींचा त्याग करून पुष्कळ शिकायचे आहे’, या विचारसरणीचा असतो.’
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
आपत्काळाच्या दृष्टीने काही साधकांना औषधे संग्रहित करून ठेवण्यात अडचण होती. त्या वेळी त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. मी भरपूर औषधे घेऊन ठेवली आहेत.’’
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
हिंदु धर्मियांनी सर्व भेद विसरून एकत्र येणे आवश्यक आहे. आमचे आणि प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचे मिशन (कार्य) एकच आहे, ते म्हणजे हिंदु धर्माचे रक्षण अन् उत्थान ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी