सनातनच्या ३ गुरूंविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात साधना शिबिर झाले. त्या वेळी संभाजीनगर येथील सौ. अनिता लटपटे यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. अनिता लटपटे

१. ‘शिबिराच्या वेळी पहिल्या दिवसापासून मला वाटत होते, ‘साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हेच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.’

२. मला व्यासपिठावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचे दर्शन झाले. प्रत्येक दिवशी मला मधे मधे त्यांचे अस्तित्व जाणवत होते.

३. एक दिवस मला चंदनाचा पुष्कळ सुगंध आला.

४. चौथ्या दिवशीही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व मला जाणवत होते. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव सर्वांकडे बघून आनंदी झाले आहेत आणि तेच सर्व सांगत आहेत’, असे मला जाणवले.

५. ‘श्री. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ शिबिरस्थळी प्रत्यक्ष आल्या आहेत’, असे मला जाणवत होते. ‘त्या तिथे आल्या होत्या’, हे मला दुसर्‍या दिवशी समजले.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच मला हे सर्व अनुभवता आले, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. अनिता लटपटे (वय ४० वर्षे), संभाजीनगर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक