१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिवसा आणि रात्री झोपतांना मी अंगावर पांघरूण घेऊन झोपतो; परंतु वाचतांना मी पडून वाचत असलो, तरी मला पांघरूण घ्यायची इच्छा होत नाही. याचे कारण काय ? (४.९.२०२४)

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विविध आध्यात्मिक दशांमुळे त्यांना पांघरूण घेण्याची इच्छा होणे किंवा न होणे

२ अ. जीवात्मा-शिवदशा : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या झोपेच्या वेळी त्यांची जीवात्मा-शिवदशा कार्यरत असते. त्यामुळे त्यांच्या जागृत अवस्थेचा लोप होऊन झोपेत त्यांची सुषुप्ती आणि तुर्यावस्था कार्यरत झाल्यामुळे त्यांची दिव्य शक्ती सुप्तावस्थेत जाते. त्यामुळे त्यांच्या मनात स्वतःच्या देहासंदर्भातील जाणीव, म्हणजे ‘देहबुद्धी’ ५ टक्के इतक्या प्रमाणात कार्यरत होते. या देहबुद्धीमुळे ते जेव्हा सकाळी किंवा रात्री झोपत असतात, तेव्हा त्यांना पांघरूण घेण्याची इच्छा होऊन ते पांघरूण घेऊन झोपतात.
२ आ. शिवात्मा-शिवदशा : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वाचत असतांना ते शिवात्मा-शिवदशेत असतात. त्यामुळे जरी ते पहुडलेले असले, तरीही त्यांची जागृत अवस्थेतील तुर्यगा अवस्था कार्यरत असल्यामुळे त्यांची दिव्य शक्ती कार्यरत होते. त्यामुळे ते समष्टीसाठी आवश्यक असलेले ज्ञान विविध ग्रंथ किंवा लिखाण यांचे वाचन करून निवडून देत असतात. त्या वेळी त्यांची देहबुद्धी केवळ १ टक्का कार्यरत असल्यामुळे त्यांची ‘देहबुद्धी’ सुप्तावस्थेत असते. त्यामुळे जेव्हा ते पहुडून वाचन करत असतात, तेव्हा त्यांना पांघरूण घेण्याची इच्छा होत नाही.
३. तात्पर्य
जेव्हा जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासारखे अवतारी गुरु सूक्ष्मातून विविध आध्यात्मिक अवस्था अनुभवत असतात, तेव्हा स्थुलातून त्यांच्या काही कृतींमध्ये पालट झाल्याचे दिसून येते. यावरून ‘सूक्ष्म जगत आणि स्थूल जगत एकमेकांशी जोडलेले असून सूक्ष्म जगताचा स्थूल जगतातील अनेक कृतींवर पुष्कळ प्रभाव असतो’, हे सूत्र शिकायला मिळाले.’
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०२४)
|