गरोदर महिलांनी ‘रामायण’ आणि ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे ! – तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन्

गर्भसंस्कार

भाग्यनगर (तेलंगाणा) – विविध गावांमध्ये आम्ही पाहिले आहे की, गरोदर स्त्रिया  रामायण, महाभारत आणि विविध प्रकारच्या संस्कार घडवणार्‍या गोष्टी वाचत असतात. तमिळनाडूत अशी मान्यता आहे की, जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने रामायण आणि त्यामधील सुंदरकांड वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्‍या मुलासाठी फार चांगले आहेे, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका गर्भसंस्कार शिबिरात केले. राष्ट्र सेविका समितीची शाखा असलेल्या‘संवर्धिनी न्यासा’च्या अंतर्गत गर्भसंस्काराचे हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. संविर्धिनी न्यास ही राष्ट्र सेविका समितीची एक शाखा आहे. तामिलिसाई सौंदरराजन् या स्वतः एक स्त्रीरोग तज्ञ आहेत.

१. राज्यपाल पुढे म्हणाल्या की, सृदृढ मुले जन्माला घालण्यासाठी वैज्ञानिक आणि पारंपरिक उपाय काय असतात ? हे आम्ही सांगणार आहोत; कारण गरोदर महिलांनी संस्कारी आणि देशभक्त मुलांना जन्म दिला पाहिजे.

२. संविर्धिनीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्ही हा गर्भसंस्कार कार्यक्रम संपूर्ण देशात पोचवणार आहोत. देशभरातील डॉक्टरांना भेटून तो संपूर्ण देशात लागू कसा करता येईल ?, हे पहाणार आहोत.