रामनाथी, २१ जून (वार्ता.) – धर्माचे रक्षण करायचे असेल, तर प्रथम स्वत: धर्माचरण करायला हवे. हिंदु युवकांच्या कपाळाला तिलक दिसत नाही. आपल्या पूर्वजांनी जानवे, तिलक आणि शिखा यांच्या रक्षणासाठी प्राणांचा त्याग केला. हिंदु युवक मात्र कपाळाला तिलक लावत नाहीत. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी युवकांनी प्रेरित करायला हवे. उल्हासनगर येथील सिंधी बांधव दुपारनंतर दुकाने बंद करतात. दुपारनंतरच्या वेळेत ही दुकाने ख्रिस्त्यांनी भाड्याने घेऊन तेथे त्यांचे कार्य चालू केले आहे. येथील काही घरांमध्ये ख्रिस्त्यांनी प्रार्थना चालू केल्या. अशा सिंधी लोकांच्या नातेवाइकांच्या घरामध्ये आम्ही सत्संग चालू केले. हिंदूंनी आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास करायला हवा.
धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही, असे उद्गार भारतीय सिंधू सभेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख श्री. प्रकाश सिरवाणी यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.