स्विडनच्या संसदेबाहेर कुराण जाळले !

स्‍टॉकहोम (स्‍विडन) – स्‍विडनच्‍या संसदेबाहेर इराकी वंशाच्‍या सलवान मोमिका यांनी कुराण जाळले. यापूर्वी मोमिका यांनीच २८ जून या दिवशी स्‍विडनच्‍या न्‍यायालयाकडून अनुमती घेऊन एका मशिदीबाहेर कुराण जाळले होते. त्‍यानंतर संपूर्ण देशात याविरोधात संताप व्‍यक्‍त करण्‍यात आला होता. इराकमध्‍ये स्‍विडनच्‍या दूतावासावर आक्रमणही करण्‍यात आले होते. त्‍यानंतरही आता पुन्‍हा कुराण जाळण्‍यात आले आहे. या वेळी मोमिका याला सलवान नाजेम याने साहाय्‍य केले. मोमिका यांनी इस्‍लामविरोधी घोषणाही दिल्‍या. पोलिसांनी एकाला अटक केली.