‘ब्रिटिशांच्या आगमनापासून हिंदुस्थानात जो आंग्लाळलेला वर्ग निर्माण झाला, त्याने श्रुति-स्मृति पुराणोक्ताची भयंकर विटंबना केली. त्याने त्यांना रानटी ठरवले. रामायण, महाभारत आणि पुराण यांचे चिकित्सेच्या आवरणाखाली विडंबन केले. त्यांचा ‘भाकड’, ‘अतिशयोक्तीपूर्ण’, ‘जंगली’ अशा शब्दांत विलक्षण उपहास केला. या संस्कृतीद्वेष्ट्यांचे सहस्रो ग्रंथ हिंदुस्थानात, जगातील ग्रंथालयांत आणि विद्यापिठांतून आहेत. आजही तेच शिकवले जातात, तरीसुद्धा आम्हा हिंदूजनांच्या स्वाभाविक अभिरूचीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. इतिहास कथन करणारी पुराणकार महर्षि व्यासांची शैली अशी अपूर्व आहे की, शेकडो ‘सेक्युलरीशाह्या’ आल्या, तरी त्या श्रुति-स्मृति पुराणोक्ताच्या आसपासही फटकू शकत नाहीत.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)