देहली पोलिसांकडून शेतकरी नेत्यांच्या विरोधात ‘लूकआऊट’ नोटीस जारी !
देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.
देहली पोलिसांकडून २० हून अधिक शेतकरी नेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. यासह शेतकरी नेत्यांची पारपत्रे जप्त करण्याची कारवाईही चालू केली जाणार आहे.
केवळ गुन्हे नोंद करून सरकारने थांबू नये, तर अशांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबवे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !
पोलीस हिंसक जमावाकडून मार खातात, याचा अर्थ ‘हिंसाचार करणार्या जमावाला ताळ्यावर कसे आणायचे, याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळत नाही’, असे समजायचे का ? जमावाकडून मार खाणारे पोलीस जनतेचे आतंकवाद्यांपासून रक्षण काय करणार ?
एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !
अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !
देहलीमध्ये शेतकर्यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. शेतकर्यांचे आंदोलन हिंसक नाही, असे म्हणणार्यांना चपराक !
शेतकरी आंदोलनातील भाषणांचा गोशवारा पहाता हा मोर्चा शेतकर्यांच्या हितासाठी होता कि केंद्र सरकार पाडण्यासाठी होता ?, आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांपैकी किती जण शेतकरी आणि किती जण साम्यवादी आहेत, याचाही शोध घ्यावा लागेल !
कराची, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी या पाकमधील शहरांमध्ये कधी ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस कुणी करू शकेल का ? मग भारतात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्याचे धाडस होतेच कसे ?
अशी मागणी का करावी लागते ? ‘अॅमेझॉन’सारख्या अॅपवरून होणारे हिंदुविरोधी आणि भारतविरोधी चित्रण लक्षात घेता केंद्र सरकारने अशा सर्वच अॅपवर तात्काळ बंदी घालणे आवश्यक !
जर तुम्हाला वाटते की, व्हॉट्सअॅप तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकणार नाही, तर तुम्ही ते तुमच्या भ्रमणभाष संचामधून काढून टाका, असा सल्ला देहली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला.