भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी ! इथेही पोलिसांनी भ्रष्टाचार केला तर . . . !

विवाहित महिलेसमवेत रहाणे ‘लिव्ह इन’ नाही, तर व्यभिचाराचा गुन्हा ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

देशातील नैतिकता इतकी रसातळाला गेली आहे की, ती टिकवण्यासाठी न्यायालयांना असा आदेश द्यावा लागतो !

राजस्थानमध्ये आयकर विभागाच्या सर्वांत मोठ्या धाडीतून १ सहस्र ७०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

राजस्थानमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात आली. २०० कर्मचारी ५ दिवस धाडीत सापडलेल्या सामानाचे मूल्यांकन करत होते. 

नोकरीचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.

मडगाव येथून २ अल्पवयीन मुलींचे अपहरण : पोलीस संशयित धर्मांधाच्या शोधात

चंद्रावाडो, फातोर्डा येथून १६ वर्षीय २ मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. पोलीस सध्या संशयित आरोपी मौलवी अब्दुल देवगिरी याच्या शोधात आहेत.

नागपूर येथील केंद्रीय कारागृहात पोलीस शिपाईच अमली पदार्थाचा पुरवठा करत होता !

कारागृहात जाणार्‍या पोलिसांचीच अंगझडती घ्यावी लागते, हे दुदैव होय !

अधिकार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण माजी आमदार राजू तोडसाम यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा

कार्यालयातील लेखापालास शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने माजी आमदार राजू तोडसाम यांना शिक्षा सुनावली

जळगाव येथील धर्माभिमान्यांची ॲमेझॉनला नोटीस !

धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तत्परतेने कृती करणारे निरंजन चौधरी यांचे आणि त्यांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता गिरीश नागोरी यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी आणि अधिवक्ते हीच हिंदूंची खरी शक्ती होय !

देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या पदाधिकार्‍यांचे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अन्वेषण

‘सपोर्टर्स ऑफ रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या ‘फेसबूक पेज’वर ‘गोवा’ भारतापासून निराळे करता येऊ शकते का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. या प्रकरणी संशयित लेस्टर अफोन्सो आदींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला होता.

५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरणार्‍या ब्रिटनमधील आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद

सीबीआयने ५ लाख ६२ सहस्र भारतियांच्या फेसबूक खात्याची माहिती चोरी केल्याच्या प्रकरणी ब्रिटनमधील आस्थापन ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.