आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी समाजाला नैतिकता आणि साधना न शिकवल्याचा परिणाम !

कणकवली – नोकरीला लावण्याचे आमीष दाखवून युवतीवर बलात्कार करणारा रतन विष्णु कांबळे (रहाणार नागवे रोड, कणकवली) याला येथील न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली आहे.
कांबळे याने विवाहित असल्याचे न सांगता नोकरीला लावतो, असे सांगून फसवणूक केली अन् शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार पीडित युवतीने कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कांबळे याला अटक करून येथील न्यायालयात उपस्थित केले होते. या वेळी सरकारी अधिवक्ता गजानन तोडकरी यांनी कांबळे याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणी कणकवली आणि राजापूर (जिल्हा रत्नागिरी) येथील पोलीस ठाण्यांत तक्रारी नोंद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
विनयभंग केल्याच्या प्रकरणी २ युवकांवर गुन्हा नोंद
सावंतवाडी – इन्सुली, गावठणवाडी येथील २ युवकांवर एक महिला आणि युवती यांचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २२ जानेवारीला दुपारी बकर्या चरायला घेऊन गेलो होतो. त्या वेळी या २ युवकांनी आम्हाला अडवून मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले, असे संबंधित महिला आणि तिची बहीण या दोघींनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !