नागपूर येथील केंद्रीय कारागृहात पोलीस शिपाईच अमली पदार्थाचा पुरवठा करत होता !

  •  गुन्हे करणारे पोलीस म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार होय !
  •  कारागृहात जाणार्‍या पोलिसांचीच अंगझडती घ्यावी लागते, हे दुदैव होय ! ही झडती प्रतिदिन का घेण्यात आली नाही, हा ही प्रश्‍न आहे. सोळंकीसारख्या कर्मचार्‍यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. असे पोलीस जनतेचे रक्षण करण्याऐवजी त्यांना व्यवसनाकडे वळवतील !

नागपूर – येथील केंद्रीय कारागृहात अमली पदार्थ घेऊन आत जाणारा कारागृहातील पोलीस शिपाईच निघाला. महेश सोळंकी (वय २८ वर्षे) असे त्याचे नाव आहे. सोळंकी हा कामावर येतांना त्याने २८ ग्रॅम चरस हा अमली पदार्थ कारागृहात नेण्याचा प्रयत्न केला आहे. तो २ वर्षांपासून कारागृहात कामाला असून हा पदार्थ तो मोज्यात लपवून नेत होता. कर्मचार्‍यांच्या आकस्मिक अंगझडतीत थरथर कापत असतांना पोलिसांना सोळंकी याच्यावर संशय आला. त्याच्याकडील असणार्‍या चरस या अमली पदार्थाची किंमत ७० सहस्र रुपये आहे, अशी माहिती धंतोली पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी २२ जानेवारी या दिवशी दिली.