पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – देशद्रोहाच्या गुन्ह्यावरून गुन्हे अन्वेषण विभागाने ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या (आर्.जी.) पदाधिकार्यांच्या चौकशीला प्रारंभ केला आहे. ‘आर्.जी.’चे नेते मनोज परब आणि इतर काही पदाधिकार्यांचे गुन्हे अन्वेषण विभागाने अन्वेषण केले.
‘आर्.जी.’चे समर्थक असलेले लेस्टर अफोन्सो यांनी हल्लीच ‘सपोर्टर्स ऑफ रिव्हॉल्युशनरी गोवन्स’ या ‘फेसबूक पेज’वर ‘गोवा’ भारतापासून निराळे करता येऊ शकते का ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित लेस्टर अफोन्सो आदींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार देशद्रोही ‘पोस्ट’ प्रसारित करण्यामागे ‘आर्.जी.’च्या वरिष्ठ अधिकार्यांचा हात असल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे.