महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता ! – मोहम्मद फैज खान, गोप्रेमी

महंमद पैगंबरांनी गोमाता वाचवण्याचा संदेश दिला होता. गायीच्या रक्षणासाठी जात आणि धर्म यांची आवश्यकता नाही. गायीचे रक्षण आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा संदेश जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न आहे. देशात धर्म परिवर्तनाचा धंदा चालू असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे

गोसंगोपन आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे – डॉ. वल्लभभाई कठिरिया

गो-संगोपनाचे महत्त्व भारतीय कृषी आणि अर्थकारण यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने घरोघरी गोसेवा व्हावी, असे आवाहन ‘राष्ट्रीय कामधेनू आयोग’चे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री डॉ. वल्लभभाई कठिरिया यांनी येथे केले. गो-सेवा….

धुळे येथील लळींग पथकर नाक्यावर गोमांस पकडले

शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग पथकर नाक्याजवळ गोमांस वाहून नेणारी बोलेरो गाडी बजरंग दलाचे संजय शर्मा आणि अन्य कार्यकर्ते यांनी पकडली. पकडण्यात आलेले गोमांस आणि गाडीची किंमत ३ लाख रुपये आहे.

हडपसर (जिल्हा पुणे) येथे चार गोवंशियांची कत्तल होण्यापासून त्यांना जीवदान

येथील गायकवाड कॉलनी सय्यदनगर येथून १४ फेब्रुवारीला रात्री साडेतीनच्या सुमारास चार गोवंशियांना कत्तल होण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानंतर गोरक्षक आणि महंमदवाडी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले असता चारही गोवंश तेथेच सोडून दिल्याचे आढळून आले.

भुसावळ (जळगाव) येथील गोप्रेमींचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन !

महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि रत्नागिरी येथे गोप्रेमींवर झालेल्या अन्याय्य कारवाईचा निषेध करत भुसावळ येथील गोप्रेमींनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर केले. चंद्रपूर येथे गोतस्करी थांबवण्यासाठी गेलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर उन्मत्त धर्मांध कसायांनी गाडी घातली.

गोसंरक्षणासाठी भाजपला इतका कालावधी का लागला ?

केंद्र सरकारने सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात गोमातेच्या संवर्धनासाठीच्या ‘कामधेनू’ योजनेसाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच ‘राष्ट्रीय गोकूळ आयोगा’ची स्थापना केली जाणार आहे.

१ सहस्र ८०० गायींचा सांभाळ करणार्‍या जर्मन महिलेला ‘पद्मश्री’

एका जर्मन महिलेला गायींचे महत्त्व लक्षात येते, ते गोरक्षकांना ‘समाजकंटक’ म्हणवणार्‍यांना कधी लक्षात येणार ?

गोरक्षणासाठी आपण आणि पूर्वजांनी काय केले ?

गायींचे रक्षण करण्यासाठी आपल्या वडिलांनी किंवा पूर्वजांनी काय केले ?, ते राजकीय नेत्यांना प्रत्येकाने विचारले पाहिजे.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पुणे आणि धाराशिव येथून १६ टन गोमांस जप्त

महाराष्ट्रात सर्वत्र गोवंश हत्याबंदी कायदा असूनही कसायांना त्याचे अजिबात भय वाटत नसल्याचे कटू सत्य समोर आले आहे. परंडा (धाराशिव) येथे गोमांसाने भरलेले आणि बाहेरून देखाव्यापुरती भुशाची पोती लावलेले १० टन गोमांस असलेले २, तळेगाव दाभाडे येथून ६ टन गोमांस असलेला एक आणि चाकण येथून ८०० किलो गोमांस असलेला एक टेम्पो पोलिसांनी कह्यात घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF