वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे धर्मांधांकडून गोसेवकांविरोधात तक्रार

गोमांस विक्री करतांना पकडून दिल्याचा राग

वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) – येथील बाजाठाण परिसरातील हमरापूर येथे गोमांस विक्री करणार्‍या हबीब कुरेशी याला अटक करण्यात आली होती. हिंदु, गोसेवक आणि ‘शिवप्रहार’च्या कार्यकर्त्यांनी कुरेशी याला पकडून विरगाव पोलिसांच्या कह्यात दिले होते. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. याचा राग मनात धरून त्याने हिंदू, गोसेवक आणि ‘शिवप्रहार’चे कार्यकर्ते यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हिंदु कार्यकर्ते, तसेच गोसेवक शरद चौधरी, प्रवीण भोसले, दीपक भोसले, दीपक भराडे, नीलेश तोडमल, पवन भराडे, ज्ञानेश्वर भराडे, अशोक गायके, शिवा दळे अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

महाराष्ट्रामध्ये गोवंशहत्या बंदी कायदा आहे, तरीही गोहत्या करून मांसविक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करणे अपेक्षित असतांना त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही; परंतु हिंदु धर्माभिमानी, गोसेवक, शिवभक्त यांच्यावर मात्र तत्परतेने कारवाई केली जाते, असा नाराजीचा सूर हिंदूंमध्ये दिसून येत आहे.

संपादकीय भूमिका 

‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशा वृत्तीच्या धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी हिंदूंचे भव्य संघटनच कार्य करील !