कर्नाटकामध्ये मागील काही दिवसांमध्ये गोहत्यांचे प्रकार वाढले आहेत. तेथे गाड्यांमध्ये कोंबून गोवंशियांची तस्करी होणे, मोठ्या प्रमाणात गोमांसाची विक्री होणे, असले प्रकारही सर्रास आढळत आहेत. त्यामुळे तेथील हिंदूंचा उद्रेक झाला आहे. तेथील हिंदू विविध माध्यमांद्वारे गोतस्करांवर कारवाई करण्यासाठी आवाज उठवत आहेत. ‘बटेंगे ते कटेंगे’ (संघटित झालो नाही, तर कापले जाऊ), या घोषणेचा महाराष्ट्राच्या राजकारणात कसा परिणाम झाला आणि काँग्रेससारख्या हिंदुद्वेषी पक्षांना हिंदूंनी कशी धूळ चारली, हे सर्वच कथित निधर्मी पक्षांनी अनुभवले आहे. त्यामुळे ‘हिंदूंचा रोष नको’, हे लक्षात घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मत्स्यव्यवसाय, पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री मंकल वैद्य यांनी ‘गायींची चोरी करणार्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देईन’, असे वक्तव्य केले आहे. वैद्य यांनी साळसूदपणे उत्तर दिले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ‘एका बाजूने हिंदूंनाही दुखवायचे नाही आणि मुसलमानांचे लांगूलचालनही करायचे थांबवायचे नाही’, असा विचार करून काँग्रेसने ही चाल खेळली आहे. एक तर वैद्य हे राज्यमंत्री आहेत. या पदावर कार्यरत व्यक्तीकडे तसे कुठलेच अधिकार नसतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी पुढाकार देऊन त्याच्याशी निगडित आदेश किंवा संबंधितांना सूचना करायच्या असतात. वैद्य यांच्याकडे असे कोणते अधिकार आहेत ? उद्या समजा त्यांनी आदेश दिला, तर तो राज्यात लागू होणार का ? तसे पाहिले, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये तरी या आदेशाचे पालन तेथील पोलीस करतील का ? त्यामुळे वैद्य यांच्या अशा हास्यास्पद विधानांना हिंदूंनी भुलू नये. त्याही पुढे जाऊन लक्षात घेण्यासारखे, म्हणजे कर्नाटकाचे गृहमंत्री हे जी. परमेश्वरन् आहेत.
गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशमूर्तीच्या मिरवणुकीवर मुसलमानांनी पेट्रोल बाँब फेकून दंगल घडवून आणली होती. त्या वेळी परमेश्वरन् यांनी ‘मिरवणुकीवर दगडफेक होणे, हे अपघाताने घडले’, असे म्हटले होते. याआधीही त्यांनी जी हिंदुद्वेषी वक्तव्ये केली आहेत, ती सर्वांनाच ठाऊक आहेत. त्यामुळे वैद्य यांनी केलेल्या वक्तव्याला हिंदूंनी गांभीर्याने घेऊ नये. त्याही पुढे जाऊन वैद्य यांनी ‘गोळ्या घालण्याचा आदेश देईन’, असे म्हटले आहे. असा आदेश त्यांनी अजून दिलेला नाही. ‘तो कधी देणार ?’, हेही त्यांनी सांगितलेले नाही. ‘मी असे करीन’, ‘मी तसे करीन’, अशा वक्तव्यांना सरकारी पातळीवर काहीही किंमत नसते. त्यामुळे एकंदरितच हा हिंदूंच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. यावरून कर्नाटकातील हिंदूंनी हे लक्षात घ्यावे की, कर्नाटकामध्ये धर्मरक्षणासाठी त्यांना प्रदीर्घ लढा द्यायचा आहे. सत्तेवर असलेले काँग्रेस सरकार हे हिंदुद्वेषी आहे. त्यामुळे हिंदु धर्म रक्षणाचे कार्य करणार्यांना संपवण्याचाच ते प्रयत्न करणार. सत्तेवर असल्यामुळे त्यांच्याकडे पद, पैसा आणि अधिकारही आहे. कर्नाटकामध्ये नेहा हिरेमठ ही लव्ह जिहादमध्ये फसली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिचे वडील निरंजन हिरेमठ हे काँग्रेसचे नेते होते. त्यांनी स्वतः ‘त्यांची मुलगी लव्ह जिहादला फसली’, असे विधान केले; मात्र काँग्रेसने त्यांच्यापासून फारकत घेतली. काँग्रेस सरकार हिरेमठ कुटुंबाला न्याय मिळवून देऊ शकत नाही. जो मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्यावर सोडत असेल, तो राज्यातील सामान्य हिंदूंना काय न्याय मिळवून देणार ? त्यामुळे कर्नाटकातील हिंदूंना जनआंदोलन उभारण्याविना पर्याय नाही !
मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्यावर सोडणारी काँग्रेस हिंदूंचे हित काय साधणार ! |