सोनवडी (दौंड) येथून १६ गायींची सुटका; ५ धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद !

सोनवडी (ता. दौंड) (जिल्हा पुणे) – येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६ गायींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. दौंड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी फाटा येथील ‘धनश्री हॅाटेल’जवळ ही कारवाई करण्यात आली. गोतस्करांकडून रस्त्यालगत दाट झुडपांमध्ये कत्तलीसाठी गायी बांधल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला. चारा, पाणी किंवा औषधोपचार यांची कोणतीही सोय न करता गायी बांधल्या होत्या. दौंड पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आल्यानंतर १६ गायींची सुटका झाली.

दौंड पोलीस ठाण्यात आकाश भैसडे यांच्या तक्रारीनुसार अझीम कुरेशी, तन्नू इस्माईल कुरेशी, बब्या कुरेशी, वाजीद कुरेशी आणि कुमेल कुरेशी यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या गायींचे एकूण मूल्य ३ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सुटका केलेल्या गायींची गोशाळेत रवानगी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • पुणे येथे, तसेच राज्यात अवैधपणे गोमांस, गोवंशीय जनावरांची वाहतूक या आणि अशा घटना प्रतिदिन घडणे, हे पोलिसांना लज्जास्पद !

  • पोलिसांकडून नोंदवलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गोहत्या वाढत आहेत, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे !