कोंढवा पशूवधगृहाचे खासगीकरण अवैध आणि रहित करण्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन !

१८ मार्च या दिवशी अतिरिक्त आयुक्तांच्या निवेदनासह कोंढवा येथील ४ सहस्र नागरिक आणि ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकार्‍यांनी मा. आयुक्त, महापालिका यांना निषेधाचे पत्रही दिले आहे.

जळगाव येथे गोरक्षक संजय शर्मा यांचे पोलिसांच्या अन्याय्य वागणुकीच्या निषेधार्थ शिवतीर्थ येथे उपोषण !

गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

खडकत (जिल्हा बीड) येथील ५ अवैध पशूवधगृहांवर कारवाई !

प्रशासनाने कठोर पावले उचलली, तर अवैध पशूवधगृहे वाढणार नाहीत.

महाराष्ट्र गोसेवा आयोगात १६ जणांची नियुक्ती !

६ मार्च या दिवशी शासन आदेश काढून ८ शासकीय, तर ८ कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती या आयोगावर करण्यात आली आहे.

सांगलीतील गोरक्षक अंकुश गोडसे यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड !

गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यात श्रीरामपूर आणि घारगाव पोलीस ठाण्यांच्या परिसरात एकूण १७ गोवंशियांना वाचवण्यात यश !

घारगावमधून संगमनेरच्या दिशेने संगमनेरच्या पशूवधगृहामध्ये गोवंशियांची कत्तलीसाठी वाहतूक करत असलेला टेंपो गोरक्षकांच्या सतर्कमुळे अडवण्यात आला आणि त्यांच्यावरही पोलिसांच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली.

राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करणार ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, गोसेवा आयोग

देशी गोवंशियांच्या संवर्धनासाठी राज्यातील ४० गोशाळा ‘स्मार्ट गोशाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या साहाय्यातून हा ‘स्मार्ट गोशाळा’ प्रकल्प साकारणार आहेत, अशी माहिती ‘गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार !

‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांना ‘सेवा कृतज्ञता’ पुरस्कार प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कल्लड्क (कर्नाटक) येथे २ क्विंटल गोमांस जप्त : २ जणांना अटक

बजरंग दल कल्लड्क प्रभागाच्या माहितीवरून पोलिसांनी गोमांस घेऊन जाणार्‍या २ जणांना अटक केली.

गो सेवेला सहकार्य करू ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे

गो सेवा करतांना विरोध होणे, ही गोष्ट चुकीची असून कोकरे गोवंश कसायाकडे जाऊ देत नाहीत, हे केवढे मोठे काम आहे.