भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि उपसरपंच यांच्यात ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचारावरून वाद !
जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि माजी उपसरपंच यांच्यात भर कार्यक्रमात ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून वादावादी झाली.
जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब आणि माजी उपसरपंच यांच्यात भर कार्यक्रमात ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून वादावादी झाली.
खारघर येथील तळोजा कारागृहासमोरील तलावात उडी मारून सीमाशुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयांक सिंग यांनी आत्महत्या केली आहे.
धान घोटाळा करणारे संबंधित केंद्रचालक आणि संचालक यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून धान खरेदी घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई न केल्यामुळे वारंवार धान घोटाळा होत आहे.
३१३ खटले २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत. न्याय मिळण्याची प्रकिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे अपेक्षित !
देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !
हिंदूबहुल देशात अल्पसंख्यांकांना सवलती देऊन देशाचे खरोखर भले झाले आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे !
अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या शिष्यवृत्तीच्या योजनेमध्ये गेल्या ५ वर्षांत १४४ कोटी ८३ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. १ सहस्र ५७२ अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांपैकी ८३० संस्थांची नोंद केवळ कागदावर असल्याचे समोर आले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी येथील आर्.एल्. समूहाची ईडीकडून तपासणी करण्यता आली.
पोलिसांचे साटेलोटे असल्याविना अशा प्रकारे न्यायालयाचा आदेश डावलून पार्ट्या होणे शक्य आहे का ? एकतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे क्लबवाल्यांशी साटेलोटे असल्याने पोलिसांवर दबाव आहे किंवा पोलीस लाचखोर आहेत, असेच म्हणावे लागेल.
अशांमुळेच एस्.टी. महामंडळ तोट्यात गेले आहे, हे यातून लक्षात येते ! यास उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांकडून हा पैसा वसूल केला पाहिजे आणि त्यांना बडतर्फ करून कारागृहात टाकले पाहिजे !