थकीत कर्जप्रकरणी जळगाव येथील आर्.एल्. समूहाची ईडीकडून तपासणी !

८७ लाख रुपये जप्त, कोट्यवधी रुपयांचे सोनेही कह्यात !

जळगाव – स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या ५२५ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी येथील आर्.एल्. समूहाची ईडीकडून तपासणी करण्यता आली. त्यात ८७ लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच दागिने सील करण्यात आले आहेत. ‘हे आस्थापन नातेवाईकांच्या नावाने असतांना अशी कारवाई करणे चुकीचे आहे’, असे माजी खासदार आणि आर्.एल्. समूहाचे संचालक ईश्वरलाल जैन म्हणाले. या तपासणीत कोट्यवधी रुपयांचे सोनेही कह्यात घेण्यात आले.

थकीत कर्ज प्रकरण मार्गी लागत नसल्याने स्टेट बँकेने देहली सीबीआयकडे केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.