गोंदिया – जिल्ह्यातील धान खरेदी घोटाळा प्रकरणात राईस मिलही सहभागी असल्याचे समोर आले आहे. धान खरेदी संस्था यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सध्या गोंदिया जिल्ह्यात मुंबई येथील ६ अधिकार्यांचे भरारी पथक आले. हे पथक धान संस्थानची चौकशी करत आहे, तसेच धान खरेदी केंद्र चालवणार्या संचालक मंडळाच्या मालमत्तेची चौकशी करणार आहे. त्याच्या अहवालानुसार कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकार्यांनी घेतला आहे.
Gondia l ५ कोटी ७२ लाख रुपयाचा धान खरेदी घोटाळा, संचालक सह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, १५ आरोपी फरारhttps://t.co/6s7Fzpqly2
गोंदिया जिल्ह्यात धान खरेदी घोटाळा, मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे : आ. विनोद अग्रवाल pic.twitter.com/VrJvp7an5n
— Maharashtra Kesari News (@maharashtrakes1) August 13, 2023
१. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये श्रीराम अटल अभिनव धान सोसायटीद्वारा ४३३ शेतकर्यांनी धान्य खरेदी केली होती. या संस्थेने १५ सहस्र ९९६ क्विंटल धान शेतकर्यांकडून खरेदी केले.
२. याची किंमत ३ कोटी २६ लाख रुपये आहे; परंतु संस्थेने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारा दिलेल्या माहितीनुसार राइस मिलला धान पुरवठा केलाच नाही. त्यामुळेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्यांनी या खरेदी केंद्राच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद झाला आहे.
३. जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या वतीने शेतकर्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष धानाची पडताळणी करून त्यांच्या सातबारानुसार अहवाल सिद्ध करून तो जिल्हाधिकार्यांना पाठवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :धान घोटाळा करणारे संबंधित केंद्रचालक आणि संचालक यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून धान खरेदी घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई न केल्यामुळे वारंवार धान घोटाळा होत आहे. |