छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाविषयी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरल्याच्या कारणावरून एक शिवप्रेमी नागरिक अभिजित नाईक यांनी नेकेलिस नोरोन्हा यांच्या विरोधात डिचोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

किल्ले रायगडावर शिवजयंती आणि छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्साहात साजरा !

छत्रपती संभाजी महाराज यांचा तिथीनुसार ३४७ वा राज्याभिषेक सोहळा, तर दिनांकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ शिवजयंती एकाच दिवशी आली आहे. राज्याभिषेक सोहळ्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कोरोनाशी लढतांना छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळते ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

छत्रपती शिवराय आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती दैवत का आहेत, तर लढण्यासाठी तलवार पकडण्याची जिगर त्यांच्यात होती. कोरोनाशी लढतांना ही प्रेरणा आणि जिद्द आम्हाला मिळत आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

शासनाने वैधानिक विकास महामंडळ बंद करून विदर्भ-मराठवाडा येथील जनतेचा विश्‍वासघात केला ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, भाजप

तसेच १ मार्चपासून चालू होणारे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वीज देयकाच्या प्रश्‍नांसह अनेक सूत्रांच्या अनुषंगाने वादळी ठरणार आहे, असेही ते म्हणाले.  

सांगली महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ! 

महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास महापौर सौ. गीता सुतार आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुष्पहार अर्पण केला.

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे रायगडावर विद्युत् रोषणाई !

डॉ. शिंदे यांनी यासाठी लागणारा निधी मी देतो मात्र रायगड अंधारात ठेवू नका, असे सांगितले आणि तशा मागणीचे पत्र दिले. यानंतर १७ फेब्रुवारी या दिवशी डॉ. शिंदे यांच्याकडून रायगडावर विद्युत् रोषणाईचे साहित्य पोच करण्यात आले. यामुळे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १८ फेब्रुवारी या दिवशी रायगड प्रकाशमान झाला.

राष्ट्ररक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अजिंक्य आणि अभेद्य जलदुर्ग उभारणारे छत्रपती शिवाजी महाराज !

१९ फेब्रुवारी २०२१ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. यानिमित्ताने….

मराठ्यांनी ३० वर्षे देहलीवर राज्य केल्यामुळेच देशाची सीमा सतलजपर्यंत पोहोचली ! – यशोधरा राजे शिंदे

सध्याच्या काळात आपल्यातील वैर विसरून आणि पूर्वीच्या चुका टाळून आपणही एकत्र आले पाहिजे.

शिवभक्तांनी स्वत:ची काळजी घेत शिवजयंती साजरी करावी ! – खासदार उदयनराजे भोसले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आज असते, तर त्यांनी प्रथम जनतेची काळजी घेतली असती. त्याप्रमाणे नागरिकांची काळजी घेणे आपले स्वत:चे आणि शासनाचे दायित्व आहे.