साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्याचा ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या वतीने निषेध

छत्रपती शिवराय वयाच्या सोळाव्या वर्षापासून पातशाह्यांपासून मुक्त करण्यासाठी लढले. त्यातही त्यांनी २ वेळा पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलण्यासाठी प्रयत्न केले. तरीही त्यांनी पोर्तुगिजांना घालवण्यासाठी आक्रमण केले नाही, असे म्हणणे कितपत योग्य ?

डिचोली (गोवा) येथील तिथीनुसार शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यात १२५ हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिषेक घालून त्यांची पूजा करण्यात आली आणि सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शिवभक्तांच्या उपस्थितीत सिंहगडावर तिथीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा !

विश्व हिंदु परिषद, पुणे आणि ‘श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती’ (सिंहगड) यांच्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेकदिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांचे रायगडाकडे प्रस्थान !

पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवनेरीहून रायगडाच्या दिशेने प्रस्थान केले आहे. पादुकांवर पवमान अभिषेक आणि रुद्राभिषेक झाला. त्यानंतरच श्री शिवाईदेवीची महापूजा बांधून आणि महाद्वार पूजन करून हा पालखी सोहळा रायगडाकडे मार्गस्थ झाला.

शिवराज्याभिषेकदिन जपानमध्ये उत्साहात साजरा !

भारतीय दूतावास आणि ‘भारत कल्चरल सोसायटी जपान’ या संस्थेने संयुक्तपणे टोकियोमध्ये प्रथमच शिवराज्याभिषेकदिन साजरा केला.

एक दृष्टीक्षेप : शिवराज्याभिषेक आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !

१२ जून २०२२ या दिवशी (तिथीनुसार) शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या निमित्ताने…

राजा मानवतेचा

आदर्श पराक्रमी पित्यासम माया गुणसंचय या मानवात एकत्र वसे ।
एकमेवाद्वितीय शिवराजा अल्प आयुष्यात अवघे मानव्य व्यापले ।।

पुढील वर्षापासून ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ प्रत्येक महाविद्यालय आणि विद्यापीठ येथे उभारली जाईल ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

पुढील वर्षापासून ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ प्रत्येक महाविद्यालयात आणि विद्यापिठात उभारली जाईल आणि प्रतिवर्षी एका गडावर विद्यार्थ्यांसह हा सोहळा शासनाच्या वतीने साजरा केला जाईल. यासाठी लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राज्याभिषेकदिन उत्साहात साजरा  !

कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सिंधुदुर्गातील भारतातील एकमेव ‘शिवराजेश्वर’ मंदिरासाठीच्या भत्त्यात वाढ करावी !

‘शिवराजेश्वर’ मंदिरासाठी सरकारकडून प्रतीमासाला केवळ २५० रुपये इतका तुटपूंजा भत्ता दिला जात आहे. या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सनील घनवट यांनी येथील शिवसेना आमदार श्री. वैभव नाईक यांना निवेदन दिले.