कोल्हापूर येथे शिवसेनेच्या वतीने राज्याभिषेक सोहळा उत्साहात !

कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालतांना शिवसैनिक

कोल्हापूर, ६ जून (वार्ता.) – येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले होते. या वेळी युवा नेते ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुग्धाभिषेक अर्पण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समस्त शिवसैनिक आणि पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करतांना ऋतुराज क्षीरसागर

या वेळी नागरिकांना साखर आणि पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर ‘हिंद प्रतिष्ठान मर्दानी खेळाचा आखाडा’ यांच्या वतीने शिवकालीन युद्धकलेची आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हारुगले, शहरप्रमुख शिवाजी जाधव, किशोर घाटगे, दीपक गौड, रणजीत जाधव, सुनील खोत, युवा सेनेचे पियुष चव्हाण, अविनाश कामते, ‘श्री शहाजी तरुण मंडळा’चे उदय शिंदे, सागर शिंदे, कपिल केसरकर, संजय केसरकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.