आज ६ जून २०२२ या दिवशी शिवराज्याभिषेकदिन (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
जर राजे येथे घडले नसते ।
देशाचे इस्लामी ख्रिस्ती मरुस्थळ झाले असते ।। १ ।।
निसर्ग आणि मातीसुद्धा इथली ।
बिनमाणसांचे ओसाड वाळवंट असते ।। २ ।।
मशिदींचे घुमट दूर-दूर उभे असते ।
मानवी मंदिर हे विराण पाषाण झाले असते ।। ३ ।।
राजे प्राणदाते ते विश्वाचे ।
नसता तुम्ही, तर विश्व कोरड्या रेतीने व्यापले असते ।। ४ ।।
‘सुजलाम् सुफलाम्’ हे शब्द कोषात उरले असते ।
पाण्यासाठी फिरणार्यांचे तांडेच दिसले असते ।। ५ ।।
तलवारीचे पाणी पाजून नराधमांना हाकलले तुम्ही ।
नसता तुम्ही, तर देशाचे अस्तित्व पुसले गेले असते ।। ६ ।।
मानवी उद्धाराप्रती कार्यरत राजे ।
मानवी मने घडवणारे उच्च ध्येयाने प्रेरित करणारे ।। ७ ।।
नसता तुम्ही, तर संजीवक भूमीचे तुकडे तुकडे झाले असते ।
पृथ्वीच्या शेवटच्या घटका मोजणार्यांचे दिवस आले असते ।। ८ ।।
मशिदी आणि चर्च यांच्या बांधकामाच्या पुरात ।
हिंदूंच्या मानसिक भ्याडपणाचे थडगे उभे असते ।। ९ ।।
एक शिवाजी पुरून उरला सर्व नराधमांना ।
नसता तुम्ही, तर राजे कुणीच पुढे सरसावले नसते ।। १० ।।
– श्री. महेश पारकर, ज्येष्ठ साहित्यिक (कोकणी आणि मराठी), शिरोडा, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |