अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीतील सनातन संस्थेचा आध्यात्मिक सहभाग !
१५.१.२०२४ पासून सनातन संस्थेचे साधक ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा’, यासाठी प्रार्थना आणि अनुष्ठान करत आहेत.
१५.१.२०२४ पासून सनातन संस्थेचे साधक ‘अयोध्येच्या श्रीराममंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा’, यासाठी प्रार्थना आणि अनुष्ठान करत आहेत.
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र ही संकल्पना आध्यात्मिक संकल्पना आहे. विश्वकल्याणासाठी जे कार्यरत आहेत त्यांचे हे राष्ट्र. ही प्रक्रिया केवळ स्थूलातील नसून सूक्ष्म स्तरावरीलही आहे.
कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली.
द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !
पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.
धर्मशास्त्र म्हणते की, बळीराज्यात धर्मशास्त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्हणजे मद्यसेवन) आणि अगम्यागमन (वेश्यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.
सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.
सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत.
उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?
सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर ‘सनातन धर्मरक्षण’ अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसमवेत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे.