सनातन संस्थेची हिंदु राष्ट्राची संकल्पना काय आहे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘आध्यात्मिक राष्ट्ररचनेला हिंदु राष्ट्र’ म्हटले आहे. वर्ष १९९८ मध्ये त्यांनी ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ हा ग्रंथ संकलित केला होता त्यावेळी त्यात समाजाला सत्त्वगुणी बनवणे, अध्यात्मकेंद्रीत राज्यव्यवस्था स्थापन करणे आणि त्यायोगे विश्वकल्याण साध्य करणे, ही हिंदु राष्ट्राची संकल्पना सांगितली होती.