पुढील वर्षी निवृत्तीवेतन प्राप्त होण्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये अधिकोषाला ‘जीवन प्रमाणपत्र’ (‘लाईफ सर्टिफिकेट’) द्यावे !

सर्वत्रच्या निवृत्तीवेतन धारकांसाठी महत्त्वाची माहिती !

मुसलमान देशांनी इस्रायलला इंधन आणि खाद्यपदार्थ यांची निर्यात करू नये ! – इरणचे आवाहन

गाझावरील बाँबफेक त्वरित बंद झाली पाहिजे. मुसलमान देशांनी इस्रायलला इंधन आणि खाद्यपदार्थ यांची निर्यात करू नये, असे आवाहन इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी केले.

उपोषण सोडा, आपल्याला अजून बरेच काम करायचे आहे ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचे आवाहन पत्राद्वारे केले. या पत्रात ठाकरे म्हणाले, ‘‘निगरगट्ट आणि असंवेदनशील शासनासाठी तुम्ही स्वत:च्या जिवाची बाजी लावू नका. उपोषण सोडा.

सणांच्या काळात छोट्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करा ! – पंतप्रधान मोदी

दिवाळीचा सण काही दिवसांवर येत आहे. मी माझ्या देशवासियांना केवळ ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करतो. स्थानिक कलाकारांनी बनवलेली उत्पादने अवश्य खरेदी करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमाद्वारे भारतियांना केले.

अमेरिकेत झालेल्या गोळीबारात २२ जण ठार !

अमेरिकेच्या लेविस्टन येथे २५ ऑक्टोबरच्या रात्री एका उपाहारगृहात करण्यात आलेल्या गोळीबारात २२ जण ठार झाले, तर ६० जण घायाळ झाले. घायाळांपैकी काही जणांनी प्रकृती चिंताजनक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘दुर्गामाता दौडी’च्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर  !

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदु, साधू-संत, राष्‍ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा आणि राष्‍ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्‍याच्‍या सुसंधीचा लाभ घ्‍या.

हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

मणीपूरमध्ये हिंसाचारग्रस्त हिंदु मैतेईंना हिवाळ्यासाठी विविध गोष्टींची आवश्यकता !

‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी गोवा सिद्ध ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, तसेच त्या अनुषंगाने गोव्यात येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गोवा राज्य आणि गोवा सरकार सज्ज झाले आहे. ही महत्त्वाची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गोव्यात तयारी पूर्णत्वाला येत आली आहे.