सरकारला शेवटची संधी, आम्ही राजकारणात उतरलो तर हाल होतील ! – मनोज जरांगे यांची चेतावणी
विधानसभेत मराठ्यांची सत्ता येणार आहे. या निवडणुकीत सत्तापालट होणार आहे. आम्हाला राजकारणात उतरायचे नाही; मात्र सरकारने आता आमची मागणी मान्य न केल्यास दुसरा पर्याय नाही. ही सरकारला शेवटची संधी आहे.