आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे ! – विश्वजीत देशपांडे, परशुराम सेवा संघ

‘परशुराम सेवा संघा’ची पिंपरी-चिंचवड विभाग बैठक

 

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ‘परशुराम सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे

पुणे, ७ जुलै (वार्ता.) – पुढील काळातील आव्हाने पेलतांना आपला इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्याला चाणक्याचा तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारसा लाभला आहे. येणार्‍या संकटाची चाहूल सर्वात आधी कळणारा ब्राह्मण समाज आहे. त्यामुळे पुढच्या काळात शिक्षण रोजगार आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये समाज बांधवांना येणार्‍या अडचणींसाठी परशुराम सेवा संघाने विशेष योजना सिद्ध केली आहे, असे प्रतिपादन ‘परशुराम सेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांनी केले. परशुराम सेवा संघाच्या पिंपरी-चिंचवड विभागाची बैठक ७ जुलै या दिवशी मोरया गोसावी सभागृह चिंचवड येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी परशुराम सेवा संघाचे श्री. ऋषिकेश सुमंत, संपर्क प्रमुख श्री. स्वप्निल कुलकर्णी, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सागर मांडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. विश्वजीत देशपांडे पुढे म्हणाले की, शासनाच्या ‘अमृत संस्थे’च्या माध्यमातूनही खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकाचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. या सर्व योजनांचा समाज बांधवांच्या उत्कर्षासाठी पुष्कळच उत्तम उपयोग होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या योजनांचा लाभ घेऊन ‘स्किल डेव्हलपमेंट’ रोजगार निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम, ‘इंक्युबॅशन सेंटर’, शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्ष यांसाठी आर्थिक साहाय्य, व्यावसायिकांसाठी व्याज परतावा योजना, गट कर्जासाठी ‘परशूराम गट कर्ज व्याज परतावा’ योजना अशा विविध योजना ‘अमृत संस्थे’ने चालू केल्या असून www.mahaamrut.org.in या वेबसाईटवरून लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

या वेळी ४१ पदाधिकार्‍यांना नवीन दायित्व देऊन तसे नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.