रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील साधक करत असलेली साधना पाहून मला पुष्कळ शिकायला मिळाले. आश्रमात आल्यानंतर माझी येथून जाण्याची इच्छा होत नाही.’

देवाप्रती भाव असलेली ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची वडाळा (मुंबई) येथील कु. ऋत्वी विकास सणस (वय ५ वर्षे) !

उद्या १७.११.२०२४ (कार्तिक कृष्ण द्वितीया) या दिवशी कु. ऋत्वी विकास सणस हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईने लिहून दिलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, हा विचार मनात येऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी केलेली आळवणी !

‘गुरुदेवांच्या चरणी मन अर्पण करायचे आहे’, असा मनात विचार आल्यावर ‘आपले मन निर्मळ नाही. आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या अधीन असलेल्या आपल्या बहिर्मुख मनाला गुरुदेवांच्या चरणी कसे अर्पण करायचे ?’, असे विचार मनात आले. त्या वेळी सुचलेली ही शब्दपुष्पे कवितेच्या रूपात दिली आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय करून तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणार्‍या कु. मधुरा चतुर्भुज !

आरंभी मी घरून आश्रमात आल्यावर मला आश्रमातील चैतन्य सहन होत नव्हते आणि मला आश्रमात रहाण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागत होता. नामजपादी उपाय केल्यानंतर मला आश्रमात रहाणे जमू लागले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सेवेच्या माध्यमातून स्वतःत पालट करणारा चेन्नई येथील श्री. हिमनीश बालाजी कोल्ला !

आता आम्हाला त्याच्या एकूण वागण्यातच पालट जाणवत आहेत. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ती (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ती (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

पू. भगवंत मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या सेवेसाठी गेल्यावर लक्षात आलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती

मी पंचांग पाहिल्यावर लक्षात आले की, त्या दिवशी तिथी वैशाख कृष्ण त्रयोदशी, शिवरात्र असे लिहिले होते. तेव्हा मला असे जाणवले की, पू. काकासुद्धा शिवभक्त होते आणि भगवान शिवाने त्यांना जवळ घेतले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘साधकत्व वृद्धी’ शिबिरात सहभागी झालेल्या धर्मप्रेमींना आलेल्या अनुभूती

एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘साधकत्व वृद्धी’ शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील धर्मप्र्रेमींना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. 

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्या ८० व्या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद्गार आणि त्याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !’, या लेखाच्या संदर्भात मिळालेले सूक्ष्म स्तरीय ज्ञान आणि आलेली अनुभूती

‘३.७.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्‍या ८० व्‍या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद्गार आणि त्‍याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !’, हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या संदर्भात मला मिळालेले सूक्ष्म स्तरीय ज्ञान आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला स्थिर राहून सामोरे जाणारे देवद, पनवेल येथील कै. प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई !

‘२७.११.२०२३ या दिवशी देवद, पनवेल येथील प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. १५.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्ताने . . .

गुरुदेवांची कृपावृष्टी !

‘देव आपल्यासाठी किती करतो !; मात्र मीच किती उणा पडतो’, असे विचार माझ्या मनात घोळत होते. त्या वेळी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना) आळवतांना जे शब्द स्फुरले, ते गुरुदेवा तुमच्या चरणी अर्पण करतो.