
‘मला अनुमाने ५ मासांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. माझे डोके दुखायला लागल्यावर मला पुष्कळ त्रास होत असे. एकदा माझ्या मनात ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (प.पू. गुरुदेव) यांचे हस्तलिखित असलेली पट्टी डोक्यावर ठेवून पाहूया’, असा विचार आला. मी त्याप्रमाणे कृती केली. नंतर मी हस्तलिखित असलेली कागदाची पट्टी डोक्यावर ठेवून दीड घंटे सेवा केली आणि नंतर झोपलो. मी सकाळी उठल्यावर ‘माझी डोकेदुखी बर्याच प्रमाणात न्यून झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले.
मला होणारा डोकेदुखीचा त्रास औषधोपचार करूनही न्यून होत नव्हता; मात्र मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हस्तलिखित असलेली पट्टी डोक्यावर ठेवल्यावर माझा त्रास दीड घंट्यात उणावला. या दीड घंट्यात डोक्यावरील हस्तलिखित पट्टी तशीच होती. ती पट्टी खाली पडलीही नाही.
दुसर्या दिवशी माझे डोके दुखत नसतांना मी ती पट्टी डोक्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, तर ती पट्टी डोक्यावर रहातच नव्हती. मला डोकेदुखीचा त्रास होत असतांना हस्तलिखित डोक्यावर ठेवणे आवश्यक असतांनाच ती पट्टी दीड घंटा डोक्यावर राहिली. ही माझ्यावरील मोठी गुरुकृपाच होती.’
– श्री. राजाराम परब, कुडाळ, सिंधुदुर्ग. (२९.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |