सावराया मज शीघ्र साई माझे धावूनिया आले ।

‘एके दिवशी मला बरे वाटत नव्हते. मला ‘चक्कर येईल’, असे वाटत होते. तेव्हा माझे यजमान श्री. संदीप मला म्हणाले, ‘‘खोलीतील भिंतीला पकडून चाल. पडू नकोस.’’ त्या वेळी मला वाटले, ‘‘मी कशी पडेन ? कारण स्थुलातून पडणे असो वा साधनेत न्यून पडणे असो, गुरुसाई सतत माझ्यासोबत आहेत आणि तेच मला सावरतात. त्या वेळी मला पुढील ओळी सुचल्या.’

सौ. स्‍वाती शिंदे

जरी मी कधी साधनेत वा भूमीवर घसरून पडू लागले ।
सावराया मज शीघ्र साई माझे धावूनिया आले ।। १ ।।

स्थूल आणि सूक्ष्मातून असे सदैव घडते ।
मला मात्र सारे घडून गेल्यावरच कळते ।। २ ।।

कृतज्ञता भाव मनी देवा ‘किती रे तू करशी’ ।
वात्सल्यभावे तू आम्हा धरिलेस पोटाशी ।। ३ ।।

– सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक