‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ यानुसार नामजप शोधणे’, या संदर्भात देवाने सुचवलेले विचार मी देवाच्या चरणी अर्पण करत आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांच्या रक्षणासाठी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ सांगणे
कलियुगात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांच्या रक्षणासाठी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार उपाय सांगितले आहेत. हे उपाय पृथ्वीवरील ‘संजीवनी’ या वनस्पतीसारखेच आहेत. रामायण काळात हनुमंत साक्षात् रुद्रावतार होता. त्यामुळे त्याला दुर्गम पर्वतावरून ‘संजीवनी’ ही वनस्पती आणणे शक्य झाले. सध्याच्या कलियुगात प्राणशक्तीवहन उपायांच्या रूपात ब्रह्मांडामध्ये दिव्य संजीवनी प्रकट झाली आहे.
२. प्राणशक्तीवहन पद्धतीतील नामजप
२ अ. प्राणशक्तीवहन पद्धतीत पहिले ३ नामजप हे ‘तेज, वायू आणि आकाश’ या तत्त्वांचे असून ते सगुण-निर्गुण दोन्ही रूपांतील आहेत.
२ अ १. तेज : सूर्यलोकातील देवता सूर्यदेवता आहे. मनुष्याच्या हाताचे मधले बोट हे सूर्यदेवतेचे प्रतीक आहे.
२ अ २. वायु : स्वर्गलोकांत वायुदेवतेचा वास असून तेथे स्वतंत्र असा वायुलोक आहे. त्याचा स्वामी म्हणून वायुदेवता विराजमान आहे. मनुष्याच्या हाताच्या अंगठ्याशेजारील बोट (तर्जनी) हे वायुदेवतेचे प्रतीक आहे.
२ अ ३. आकाश : स्वर्गलोकाच्या वरच्या बाजूस आकाशलोक असून त्याचा विस्तार संपूर्ण ब्रह्मांडात असतो. समुद्रलोक (टीप १) ते सप्तपाताळ येथपर्यंत त्याची व्यापकता पसरली आहे. मनुष्याचा अंगठा हे आकाशदेवतेचे प्रतीक आहे.
टीप १ – समुद्रलोक : आकाशलोकाची व्याप्ती ‘आकाशलोक ते स्वर्ग, भू, भुव, क्षितीज, समुद्रलोक ते सप्तपाताळ येथपर्यंत आहे. समुद्रलोक हासुद्धा वेगळा लोक असून तो क्षितीज आणि सप्तपाताळ यांच्यामध्ये असतो. ‘समुद्रातील जलचर, उदा. नागलोक, मत्स्यलोक यांसारखे विविध लोक हे सप्तपाताळात आहेत’, असे वाटत असले, तरी तसे नसून त्यांचा समावेश समुद्रलोकात होतो. सृष्टीच्या रचनेत ‘सप्तलोक आणि सप्तपाताळ’ असा उल्लेख असला, तरी सर्व जलचर जीव यांचा निवास समुद्रलोकातील त्यांना नेमून दिलेल्या त्यांच्या उपलोकात असतो.

२ आ. मोठ्या अनिष्ट शक्तींची पंचमहाभूतांवर पकड असल्याने सृष्टीतील जिवांना त्यांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना पुढच्या टप्प्याचे उपाय शोधून दिले असणे
सूर्य, वायू आणि आकाश या तिन्ही देवता सगुण, सगुण-निर्गुण अन् निर्गुण रूपांत जप आणि मुद्रा यांच्या माध्यमातून जिवांचे रक्षण करतात. सद्यस्थितीत मोठ्या अनिष्ट शक्ती अंतिम पाताळातील शक्ती वापरून युद्ध करत आहेत. अनिष्ट शक्तींची पंचमहाभूतांवर पकड असल्याने सृष्टीतील जिवांना पंचमहाभूतांच्या प्रकोपाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना पुढच्या टप्प्यांचे उपाय शोधून दिले आहेत.
३. ब्रह्मांडातील विशाल लोक आणि त्यांच्याशी संबंधित जप !
ब्रह्मांडातील तपोलोकात एकूण ३ वेगवेगळ्या अती विशाल अशा पोकळ्या, म्हणजे लोक आहेत. त्यांना अनुक्रमे ‘शून्यलोक’, ‘महाशून्यलोक’ आणि ‘निर्गुणलोक’ असे संबोधतात. येथील शिवात्मे, ऋषी आणि मुनी यांची ऊर्जा, शक्ती, तसेच आशीर्वाद हे सर्व प्राणशक्तीवहन उपायांच्या माध्यमातून केलेल्या नामजपामुळे साधकांना प्राप्त होते अन् त्यांचे रक्षण होते.
या पोकळीतील (लोकांतील) तपस्वी, ध्यानी आणि ज्ञानी हे अखंड प्रकाशरूपात अन् निर्गुणातच असतात. सृष्टीतील जिवांना समजण्यासाठी त्या तपस्वींनी सगुण देह धारण केला, तर तेजस्वी तपोबली आणि महाबली यांना खालील रूपात अनुभवू शकतो.

३ अ. शून्यलोक : या लोकातील शक्ती ‘शून्य’ या नामजपाने मिळू शकते. यातील पोकळी ही फिकट भगव्या रंगाची असून हा रंग या लोकात येणार्या जिवांची सहस्रो आणि लक्षावधी वर्षांची साधना दर्शवतो. येथील ऋषिमुनी हे तेजस्वी आणि तपस्वी असून त्यांनी दिव्य भगवी वस्त्रे धारण केलेली आहेत. त्या ऋषिमुनींची कांती दिव्य असून ते सृष्टीच्या रक्षणासाठी भगवंताच्या आदेशानुसार ५ व्या पाताळातील वाईट शक्तींशी लढू शकतात.
३ आ. महाशून्यलोक : या लोकातील तपस्वींनी पांढर्या रंगाची वस्त्रे धारण केलेली आहेत. येथील असंख्य ऋषी एकाच वेळी कमंडलू आणि जपमाळ घेऊन दिव्य अशा महाशून्यलोकाच्या पोकळीत ध्यानाच्या माध्यमातून ६ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींशी अहोरात्र युद्ध करत आहेत. आता या लढ्याची तीव्रता ८० टक्के आहे. त्यामुळे साधकांना नामजप शोधतांना पुष्कळ वेळा ‘महाशून्य’ हा नामजप मिळतो.
३ इ. निर्गुणलोक : या लोकातील शक्ती ‘निर्गुण’ या नामजपाने प्राप्त होते. येथील तेजस्वी तपस्वींनी निर्गुण रंगाची वस्त्रे धारण केलेली आहेत. या लोकातील तपस्वी ७ व्या पाताळातील मोठ्या अनिष्ट शक्तींशी युद्ध करून जिवांचे रक्षण करतात.
३ ई. ॐ लोक : ‘ॐ लोक’ म्हणजेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची एकत्रित शक्ती असलेला लोक होय. तो तपोलोकाच्या वर असून या लोकातील तपस्वी ‘ॐ कार साधने’च्या माध्यमातून एकाच वेळी ५ व्या, ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील अनिष्ट शक्तींशी लढून सृष्टीचे रक्षण करतात.
या लढ्याच्या वेळी साधकांचे शरीर, मन आणि बुद्धी ही युद्धभूमी होते. या वेळी होणारी आक्रमणे ही सप्तपाताळांतून, तर प्रतिआक्रमणे ही सप्तलोकांतील तपोलोकातून होत असतात.
अशा प्रकारे प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय हे ‘कलियुगातील संजीवनी’ असून तेच साधक-जिवांना जिवंत ठेवत आहेत.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (१४.७.२०२४)
|