पिसोळी (पुणे) येथे असलेल्या सांकला विस्टा सोसायटीमधील स्थापित श्री गणेशमूर्ती पोलिसांनी हटवली !

‘ट्विटर युझर’ने प्रसारित केलेल्या माहितीवरून हिंदूंमध्ये संताप

पुणे – ‘माणिक’ नावाच्या ‘ट्विटर युझर’ने दिलेल्या माहितीनुसार पिसोळी भागातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ‘सांकला विस्टा सोसायटी’मध्ये ३० मार्च या दिवशी क्लब हाऊसमधील श्री गणेशमूर्ती हटवायला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनुमाने २५-५० पोलीस आणि कर्मचारी आले होते. यामुळे हिंदू संतप्त आहेत. (विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशी घटना घडणे अपेक्षित नाही. हिंदु देवतांच्या मूर्ती असुरक्षित असणे गंभीर आहे. – संपादक)