(म्हणे) ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’ – अभिनेता झिशान अय्युब यांचा प्रश्‍न

धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

आरोपी राजीव सक्सेना याने घेतले काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि सलमान खुर्शिद यांचे नाव !

ऑगस्टा वेस्टलँड व्यवहारातील आरोपी राजीव सक्सेना यांनी चौकशीमध्ये काँग्रेसच्या नावांचा उल्लेख केला आहे.

घोटाळ्याचा आरोप असणारे मेवालाल चौधरी यांना केले बिहारचे शिक्षणमंत्री !

भाजपचे तारकिशोर प्रसाद केवळ १२ वी शिकलेले आहेत व त्यांना अर्थ खात्यासारखे महत्त्वाचे खाते दिल्याने सरकारवर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

पुष्पगुच्छ आणि हार-तुरे यांसाठी साडेपाच सहस्र रुपयांचा ठाणे महानगरपालिकेचा प्रस्ताव; भाजप नगरसेवकांचा आक्षेप

महानगरपालिकेतील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, उपक्रम यांसाठी आणि पदाधिकारी अन् अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप, हार-तुरे देण्यासाठी, तसेच फुलांची सजावट आदी साहित्यासाठी प्रतिदिन साडेपाच सहस्र रुपये व्यय करण्याचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने सिद्ध केला आहे.

सिंधुदुर्गातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, किल्ले आणि स्मारके खुली

जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक आणि नागरिक यांच्यासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळेही खुली करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली  

श्रीकृष्ण विराजमानसह ८ याचिकाकर्त्यांची याचिका न्यायालयाने स्वीकारून नोटीस दिली

अलीगड (उत्तरप्रदेश) येथील श्रीगुरु गोशाळेत बनवल्या जातात शेणापासून पणत्या !

केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा गोशाळांना पणत्या अन् अन्य वस्तू बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे !

महिलांसाठी असुरक्षित महाराष्ट्र !

दळणवळण बंदीच्या काळातही हिंदु जनजागृती समिती ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण वर्ग, युवती शौर्यजागृती व्याख्याने आयोजित करते. त्याचा महिला-युवती यांनी लाभ घ्यायला हवा. महिलांनी प्रशिक्षण शिकून स्वतःचे रक्षण स्वतःच करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू

गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १०३ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९९ आहे.

किती मुसलमान तरुणी हिंदु तरुणांशी विवाह करतात ! – रामेश्‍वर शर्मा, हंगामी  अध्यक्ष, विधानसभा, मध्यप्रदेश

पाकिस्तान आणि आय.एस्.आय.चे हस्तक ‘सीते’ला ‘रुबिया’ बनवण्याचा कट रचत आले आहेत.