(म्हणे) ‘प्रेम करण्यापूर्वी धर्म पहायचा का ?’ – अभिनेता झिशान अय्युब यांचा प्रश्‍न

मध्यप्रदेश सरकारच्या प्रस्तावित लव्ह जिहादविरोधी कायद्याला विरोध

  • धर्मांध तरुण हिंदु तरुणीचा धर्म पाहूनच प्रेम करण्याचे नाटक करतात, हे अय्युब यांना ठाऊक असूनही ते वेड पांघरून पेडगावला जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • धर्मांध तरुण धर्म पाहून प्रेम करत नसते, तर देशातील शेकडो प्रकरणांत मुसलमान तरुणांनी त्यांचे खरे नाव लपवून हिंदु नाव धारण करत हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या नसत्या. उघड झालेल्या अशा असंख्य प्रकरणांपैकी तारा सहदेव या भारतीय नेमबाज तरुणीचे प्रकरण सर्वश्रूत आहे !

मुंबई – प्रेम केल्यावर तुरुंगात जावे लागेल कि प्रेम करण्यापूर्वी धर्म पहावा लागेल ? घाबरू नका. समाजात द्वेष पसरवणार्‍यांना आता कुणी रोखणार नाही. उलट टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले जाईल.

‘लव्ह जिहाद’सारख्या एका खोट्या संकल्पनेवर कायदा सिद्ध केला जात आहे. (हे अय्यूब कोणत्या आधारे सांगत आहेत ? – संपादक) वाह सरकार कमाल केलीत तुम्ही, असे ट्वीट अभिनेता झिशान अय्युब यांनी मध्यप्रदेश सरकार करणार असलेल्या ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी केले आहे.

मध्यप्रदेश सरकार अजामीनपात्र गुन्हा असणारा कायदा आणणार आहे. यात दोषींना ५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असणार आहे.