आवश्यक बहुमत नसल्याने घटनादुरुस्तीद्वारे इच्छा पूर्ण करणे ट्रम यांना अशक्य !
वॉशिंग्टन (अमेरिका) – मला वाटते की, मी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही, पण तुमची इच्छा असेल, तर मी याचा विचार करू शकतो, असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांनी केले. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेण्यापूर्वी वॉशिंग्टनमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले.
१. अमेरिकेत एखाद्या व्यक्तीला दोनदाच राष्ट्राध्यक्ष होण्याची तरतूद आहे. ट्रम्प दुसर्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. ट्रम्प यांनी तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना यासाठी घटनादुरुस्ती करावी लागेल. यासाठी अमेरिकी खासदार आणि राज्ये यांचे समर्थन आवश्यक असेल; मात्र ट्रम्प यांच्या पक्षाकडे तितके बहुमत नाही.
२. मुळात अमेरिकेत केवळ दोनदाच राष्ट्राध्यक्ष होण्याची तरतूद नव्हती. वर्ष १९५१ मध्ये राज्यघटनेत २२ दुरुस्त्या करण्यात आल्या. तेव्हा अमेरिकेत एक व्यक्ती केवळ दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकते, असा नियम करण्यात आला.
३. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दोनदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर निवृत्ती घेतली. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षांनी दोनपेक्षा अधिक काळ काम न करण्याचा अनौपचारिक नियम बनला. त्यानंतर अमेरिकेत ही परंपरा बनली.
४. फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांच्या काळात ही परंपरा मोडली गेला. वर्ष १९३३ ते १९४५ या काळात ते ४ वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. यानंतर २२ व्या घटनादुरुस्तीद्वारे दोनपेक्षा अधिक काळ राष्ट्राध्यक्ष निवडता येणार नाही, असा कायदा करण्यात आला.